Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

सरल डेटाबेस प्रणाली बाबत सूचना


सरल डेटाबेस प्रणाली बाबत सर्व मुख्याध्यापकांसाठी सुचना -

सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट वर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन स्टेप मध्ये माहिती भरणे आवश्यक आहे .

१. शाळेतील असलेले वर्ग व तुकड्या तयार करणे .
२. शाळेतील शिक्षक नोंदवून त्यांचे पासवर्ड तयार करणे.
३. तयार केलेल्या तुकड्यांना वर्ग शिक्षक नेमणे .

या तीन पायऱ्या नुसार कार्यवाही केल्यानंतर वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतात. वरील माहिती कशी भरायची याविषयी step by step माहिती आपणास देऊ इच्छितो.
१. सर्व प्रथम आपल्या कम्प्युटर ला इंटरनेट जोडणी आवश्यक आहे . इंटरनेट जोडणी असलेल्या संगणकावर fire fox किंवा google chrome हे ब्राउजर असणे आवश्यक आहे.
२. आपल्या संगणकावर इंटरनेट ब्राउजर मध्ये www.education.maharashtra.gov.in हा वेब अड्रेस टाका व गो या बटनावर क्लिक करा किंवा इंटर बटन दाबा.
३. वरील क्रिया पूर्ण झाल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाची वेब साईट ओपन होईल. यामध्ये school, staff, student असे तीन Tab दिसतील या तीन मधील student Tab वर क्लिक करा.
४. Student Tab वर क्लिक केल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे window ओपन होईल. खालील फोटोत दाखविल्या प्रमाणे Login here या कोपऱ्यात सुरवातीला drop down लिस्ट मध्ये head master असे निवडा त्यानंतर username मध्ये आपल्या शाळेचा udise code टाका.Password मध्ये password टाका. Captcha box मध्ये वरील दिसणारे अंक टाका आणि login वर क्लिक करा.
५. login झाल्यावर नवीन पासवर्ड तयार करा अशी विंडो ओपन होईल. नवीन password तयार करा. नवीन पासवर्ड आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल वर sms द्वारे जाईल.
६.नवीन sms तयार झाल्यावर पुन्हा लोगिन करा. (head master)
७. लॉगीन झाल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल . त्यामध्ये school details वर क्लिक करून शाळेची माहिती भरा. त्यामध्ये मुख्याध्यापकांचे नाव , शाळेचा फोन नंबर, मुख्याध्यापक जन्म तारीख, मुख्याध्यापक यांचा मोबाईल नं सेव करा.व नंतर logout करायला विसरू नका.                                                                          .................श्री .नागेशकुमार  धनवे .                                                                        .................मो.नं.८८८८७७६६९२

1 टिप्पणी:

  1. धनवे सर आपले हार्दिक आभार शैक्षणिक सर्व माहीती एका क्लिक वर एकदम खासच तुमचा ब्लाग अतिशय आवडला👌

    उत्तर द्याहटवा